© जिल्ह्यात गाय, बैल, वासरू या गोवंशीय जनावरांची संख्या 3 लाख 24 हजार 756 इतकी आहे. सध्या जिल्ह्यात लम्पिची साथ असून दोन महिन्यात 3601 जनावरांना रोगाची लागण झाली असून त्यापैकी 1768 जनावरे बरी झाली आहेत. 1600 जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर 233 जनावरे या रोगाने दगावली आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले आहे.
© शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास नेताजी तथा व्ही. एन. शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. दीड वर्षांनंतर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळाला आहे.
© सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात 98 गावांचा समावेश आहे. एकूण भौगोलिक क्षेत्र 69 हजार 561 हेक्टर असून त्यातील एकूण पेरणीलायक क्षेत्र 61 हजार 238 हेक्टर आहे. बागायती क्षेत्र 48 हजार 960 असून एकूण जिरायती क्षेत्र 8 हजार 540 हेक्टर आहे. शेतकरी खातेदार 1 लाख 51 हजार 777 आहेत.
© वाळवा तालुक्यात साधारण ३० वर्षांपूर्वी ६ हजारांवर बैलजोड्या होत्या. आज फक्त ६०० बैलजोड्या आहेत. २ हजारांवर ट्रॅक्टर आहेत. मळणी यंत्र, कडबा कुट्टी यंत्र, पॉवर टिलर, फवारणी यंत्रांची संख्या प्रचंड वाढली आहे.
No comments:
Post a Comment